...अन् नांदेड विभागातील कामांना आली गती
औरंगाबाद - दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात संथगतीने सुरू असलेल्या रेल्वेच्या विविध कामांना दोन दिवसांपासून गती आली आहे. कधी नव्हे एवढ्या जोमाने रेल्वेचे कार्मचारी ठेकेदार कामे करू लागले आहे. याला कारणही तसेच आहे. "दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आठवडाभरात नांदेड विभागाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे औरंगाबाद परिसरात रेल्वे रुळांची तपासणी सुरू आहे. हा दौरा मात्र शिर्डी दर्शनासाठी ठेवण्यात आल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.
दक्षिण भारतातील राजकीय नेते, रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, कर्मचारी, अधिकारी, मंत्री हे सगळे दौऱ्याच्या नावाखाली शिर्डीदर्शन सहल साधून घेतात. नव्याने रुजू झालेले दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र...
more... गुप्ता हे आठवडाभरात नांदेड विभागाला भेट देणार आहेत. यातच शिर्डी दर्शनही घेणार असल्याची माहिती एका विश्वसनीय सूत्रांनी "सकाळ‘ला दिली. या दौऱ्यामुळे अडगळीत ठेवण्यात आलेली नांदेड विभागातील रेल्वेची कामेही सध्या सुरू झाली आहेत. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या सरकत्या जिन्याचे कामही दोन महिन्यांपासून बंद ठेवलेले कामही चालू झाले आहे. रविवारी औरंगाबाद ते मनमाडदरम्यान रेल्वे रुळाची तपासणी करणारे मशीन दाखल झाले. इतर रंगरगोटी आणि छोटी-मोठी कामेही करण्यात येत आहेत. दौरा होईपर्यंत ही कामे जोमात चालतील, दौरा संपल्यानंतर पुन्हा जैसे थे राहणार, याबद्दल कोणतीही शंका नाही. महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांनी डिसेंबर महिन्यात भेट दिली होती. त्या वेळी अनेक कामे नांदेड विभागात करण्यात आली. या वेळीही बरीच कामे होण्याची शक्यता आहे. महाव्यवस्थापकांचा दौरा वारंवार घडो, म्हणजे तरी ही कामे मार्गी लागतील, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.