रेल्वेस्थानक बनले नशेखोरांचा अड्डा
रात्री प्रवाशांमध्ये भीती; पोलिसांच्या आशीर्वादाने असामाजिक तत्त्वांचे आश्रयस्थान
सकाळ वृत्तसेवा
...
more... नागपूर, ता. १ : नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर असामाजिक तत्वांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे. यात व्यसनी लोकांचा अधिक भरणा असून यामुळे प्रवाशांच्या सामानाचे चोरीचे प्रमाणही वाढले आहे. रात्री नशा करणारे फलाटाचा आश्रय घेत असल्याचे दिसून येते. याकडे रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.
मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला असून व्यसनींसाठी अड्डा बनला आहे. रात्र होताच असामाजिक तत्त्व रेल्वे स्थानकावर आश्रय घेतात. एफओबी, फलाट आणि रुळाचा परिसर, पार्किंग, प्री-पेड ऑटो बूथची मोकळी जागा आणि आरक्षण कक्षाजवळ सुद्धा नशेबाज दिसून येतात. असामाजिक तत्त्वाचे लोकं गांजा व इतर अमली पदार्थाचे सेवन करत असल्याने रात्रीच्या वेळी स्थानकावर राहणाऱ्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याकडे लोहमार्ग पोलिस व आरपीएफकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
भिकाऱ्यांची संख्या रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात आहे. मुख्य प्रवेशद्वाराकडून फलाट क्रमांक ८ वर जाणाऱ्या फूट ओव्हर ब्रीजवर ठिकठिकाणी भिकारी बसलेले असतात. त्यांच्याआड असामाजिक तत्त्वाचे लोकं सुद्धा फायदा घेत आहे. नशेबाजी करण्यासाठी रात्रीला रेल्वे स्थानक गाठत असल्याने व्यसनीसाठी हा अड्डाच बनला आहे. रुळाच्या परिसरात घोळक्याने जुगार, मद्यपान, गांजा ओढणे असे प्रकार सर्रास सुरू आहे. रेल्वेतून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचे अनेकदा पुढे आले आहे. रेल्वे पोलिसांनी गाडीतून गांजा तस्करांना अटकसुद्धा केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील नशेबाजांची साटेलोटे तस्करांसोबत असण्याची शक्यता नाकारता ये नाही. दिवसांपेक्षा रात्र होताच नशेबाज व्यसनासाठी रेल्वे स्थानक गाठतात. जोडी व टोळक्याने बसून नशेबाजी करतात. अशावेळी प्रवाशांवर नशेबाजांचा नजरा वाईट असतात. त्यामुळे रात्री स्थानकावर असलेल्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
पोलिसांचा धाक नाही
नशेबाज पोलिसांना जुमानत नाही. पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे वास्तव आहे. रात्रीला पोलिसांची गस्त स्थानकावर फारशी नसते. लोहमार्ग पोलिस केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेऊन कारवाई करतात. मात्र, प्रत्यक्ष अवैधकृत्यांवर त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा नशेबाजांना पोलिसांचा अभय आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे.
नशेबाज चोरीत सक्रिय
रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान, मोबाईल चोरी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. चार्जिंगवर लावलेले मोबाईल क्षणात चोरी होत आहे. असामाजिक तत्त्वाचे लोकं व नशेबाजी करणारे रात्रीला आपला डाव साधतात. व्यसनींना पैशांची गरज असते. त्यामुळे मोबाईल चोरी करून ते व्यसनाची गरज पूर्ण करतात. दिवसा सुद्धा चोरीचे प्रकार होत असल्याने पोलिस सुस्त व प्रवासी धास्ती असतात.
स्थानकावर अमली पदार्थ सेवन केलेले आढळल्यास लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल मिळून संयुक्तरित्या कारवाई केली जात आहे.
- वैशाली शिंदे, प्रभारी अधिक्षक लोहमार्ग पोलिस
Nagpur, Nagpur-Today
02/11/2022 Page No. 2
click here