❤️💫"सफर भारतीय रेल्वेची"💫❤️
.
.
११०१९ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस.
.
१९७८...
more... मधे तत्कालीन रेल्वेमंत्री दिवंगत कै. मधु दंडवते ह्यांनी सिकंदराबाद ते भुवनेश्वर या शहरांच्या दरम्यान ही रेल्वेगाडी सुरू केली होती, तेव्हा या गाडीचा क्रमांक २११९/२१२० असा होता, आणि ह्या गाडीचा रेक २१०१/२१०२ "मिनार एक्सप्रेस" ह्या गाडीसोबत शेअर केला जात असे जीचा मुळ मार्ग सिकंदराबाद ते मुंबई असा होता. मुंबई आणि भुवनेश्वर ह्या शहरांमधील प्रवासी वर्गाच्या वाढत्या मागणीवरून १९९४ मधे ह्या दोन्ही गाड्यांची 'रेक शेअरिंग' ही प्रणाली रद्द करून पुढे ११०१९/२० मुंबई - भुवनेश्वर - मुंबई "कोणार्क एक्सप्रेस" आणि १२७०१/०२ मुंबई - हैद्राबाद - मुंबई "हुसेनसागर एक्सप्रेस" ह्या दोन गाड्या रेल्वेच्या सेवेत रुजू करण्यात आल्या.
.
मुंबईहून सुण्याची वेळ - दुपारी ०२:०० वा.
भुवनेश्वर पोहचण्याची वेळ - रात्रौ ११:२० मिनिटे (दुसऱ्या दिवशी)
.
.
गाडीचा विभाग - मध्य रेल्वे
रेक - एल एच बी (LHB)
भोजनयान - आहे.
.
प्रवास वेळ - ३३ तास २० मिनिटे
एकूण अंतर - १९२९ किमी
एकूण थांबे - ३८
सरासरी वेग - ५८ किमी/प्रतीतास
.
.
रेल्वे गाडीचा मार्ग
.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भुवनेश्वर मार्गे कल्याण, पुणे, सोलापूर, वाडी जंक्शन, सिकंदराबाद जंक्शन, विजयवाडा जंक्शन, विशाखापटणम जंक्शन, खुर्दा रोड जंक्शन
.
.
अशीच माहिती मिळविण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत रहा, शेअर करा आणि हो चॅनल ला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
.
.
धन्यवाद
.
😊😊
.
.
#backpackeramey.
.
आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.
click hereआपल्या फेसबुक पेज ला लाईक करा.
click hereआपल्या ट्विटर पेज ला फॉलो करा.
click hereआपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा.
click here