दक्षिण मध्य रेल्वे
जनसंपर्क विभाग, नांदेड
प्रेस नोट. क्र. 504
दिनांक:...
more... 10.10.2024
विषय : धम्म परिवर्तन दिवस निमित्त नागपूर मार्गे नांदेड- अमला-नांदेड विशेष गाडी ची एक फेरी
धम्म परिवर्तन दिवस निमित होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड- अमला- नांदेड विशेष गाडी ची एक फेरी नागपूर मार्गे करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे -
- 01. गाडी क्रमांक 07025 नांदेड ते अमला ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 11 ऑक्टोबर, 2024 ला शुक्रवारी रात्री 21.00 वाजता सुटेल आणि मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्त्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपाळकुटी, नागपूर मार्गे अमला येथे शनिवारी सकाळी 11.00 वाजता पोहोचेल.
02. गाड़ी क्रमांक 07026 अमला ते नांदेड ही विशेष गाडी अमला येथून दिनांक 12 ऑक्टोबर, 2024 ला शनिवारी रात्री 20.00 वाजता सुटेल आणि नागपूर, पिंपाळकुटी, आदिलाबाद, किनवट, सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड मार्गे नांदेड येथे रविवार सकाळी 10.15 वाजता पोहोचेल.
या विशेष गाडीला जनरल चे 17 डब्बे मिळून 19 डब्बे असतील, गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.
आदरणीय संपादक साहेबांना विनंती आहे ही बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी. जनसंपर्क कार्यालय, नांदेड 1