रेल्वेत लोअर बर्थसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता
मुंबई : रेल्वेच्या प्रवासात रात्री स्लीपर बर्थला प्रचंड मागणी असतेच. त्यात एकदम खालच्या बर्थसाठी अधिक मागणी असते. रुग्ण आणि वृद्धांसाठी तर एकदम खालचा बर्थ अत्यंत सोयीचा ठरतो. त्यामुळे रेल्वेच्या स्लीपर डब्यात लोअर बर्थ बुक करायचा असेल, तर आता तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कदाचित ५0 ते १00 रुपये जादा द्यावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच नवे धोरणा आणण्याची तयारी रेल्वे प्रशासन करत आहे.रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना बर्थचा पर्याय निवडावा लागतो. या वेळी प्रवासी लोअर बर्थ निवडतात. महिला वर्ग, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक नेहमी लोअर बर्थला प्राधान्य देतात. चार्ट बनवताना रेल्वे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करतात. लोअर बर्थच्या याच वाढत्या मागणीनुसार त्यावर अधिकचा दर आकारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे...
more... लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास आता मूळ तिकिटासोबतच अतिरिक्त ५0 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन शक्कल लढवताना दिसते. हा देखील त्याचाच एक भाग आहे; पण महिला, गरोदर माता आणि ज्येष्ठांसाठी हा निर्णय जुलमी ठरू शकतो. रेल्वे मंत्रालयानुसार, जर लोअर बर्थसाठी अतिरिक्त रुपये वसूल केले, तर लोकांची मागणी कमी होईल. परिणामी, लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असाही एक तर्क लढवला जात आहे.