Keyman's alertness avoids huge disaster. 150 keys of track near the parli (PRLI) railway station are missing.
रेल्वे घातपाताचा कट उधळला परळीजवळ रुळाच्या १५0 चाव्या गायब किमॅनच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
परळी : परळीजवळील हैदराबादकडे जाणार्या मार्गावरील रेल्वे रुळाच्या १५0 ते २00 चाव्या काढल्याने मोठी खळबळ उडाली. या मार्गावर रेल्वे घातपात करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळाच्या चाव्या काढल्या का? याची शहानिशा प्रशासन करीत असून, याबाबतच्या सर्व शक्यता पडताळल्या जात आहेत. वेळीच या क्षेत्राच्या किमॅनच्या लक्षात ही बाब आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
परळी...
more... रेल्वे स्टेशनपासून हैदराबादकडे जाणार्या मार्गावरील गेट नंबर १२0 जवळ रेल्वे पटरीवरील १५0 ते २00 रुळाच्या चाव्या अज्ञाताने रात्रीच्या सुमारास काढून टाकल्याचे निदर्शनास आले. या गेटपासून २६६/३ ते २६५/१४ या क्रमांकापर्यंतच्या रुळाच्या दोन्ही बाजूला असलेल्या चाव्या काढून टाकण्यात आल्याचे रेल्वेचे किमॅन अंशुमन कुमार यांच्या सकाळी ७.२0 वा. निदर्शनास आले. त्यांनी गांभीर्य ओळखून वरिष्ठांना ही बाब कळवून तातडीने नवीन चाव्या बसवून रेल्वेमार्ग सुरक्षित केला. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, वारंवार रेल्वे मार्गावर वाहतुकीला येणारे अडथळे, तांत्रिक बाबींमध्ये खोडसाळपणा करणो, रेल्वे पटर्यावर दगड ठेवणो आदी प्रकार मोठय़ा प्रमाणात समोर येत आहेत. त्यातच परळी या सर्व बाजूंना जाणार्या रेल्वेचे मध्यवर्ती स्थानकाजवळील रेल्वे मार्गावर ही खळबळजनक घटना घडली असल्याने हा घातपाताचाच प्रकार असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने परळीत दाखल झाले आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या एक्सपर्ट टीमने घटनास्थळी पाहणी केली.